Sanjay Raut : संजय राऊत यांच्यावर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut news

Sanjay Raut : संजय राऊत यांच्यावर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

मुंबईः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर ठाण्यातल्या कापूरबावडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूर याला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना तसे पत्र काल दिले होते.

खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी ठाण्यातल्या कुख्यात गुंडाला सुपारी दिली आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. याबद्दल त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे. या प्रकारानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

संजय राऊतांचा भांडाफोड- नरेश म्हस्के

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, पोलिस अधिकारी राऊत यांच्याकडे जबाब घेण्यासाठी गेले होते. जबाब देताना संजय राऊत यांनी 'सामना'मधील एका व्यक्तीने त्यांना सांगितले की राजा ठाकूर आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न, हल्ला होणार आहे.

दुसऱ्या बाजूला, याच 'सामना'मधील काम करत असलेल्या व्यक्तीने जबाबामध्ये असे सांगितले आहे की, ठराविक असे कोणत्याही आमदार, खासदार यांचे नाव घेऊन ते त्यांच्यावर हल्ला करणार याबाबत काही ही एक सांगितलेलं नाही. श्रीकांत शिंदे आणि राजा ठाकूर यांचं आणि कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊन बोलेलेलो नाही, असं स्पष्ट झालेलं असल्याचं म्हस्के म्हणाले.

टॅग्स :Sanjay RautShiv Sena