
Shivsena: सत्तासंघर्षाच्या निकाला आधीच उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर तब्बल ९ महिने सुनावणी सुरू होती.
दरम्यान कोर्टाच्या निकालावर देशाचं लक्ष लागून आहे. मात्र या निकालावर कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही की निकाल कसा लागेल. तरी देखील राज्यात आणि राज्या बाहेरील ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जात आहे.
राज्यातील 40 आमदार आणि अनेक खासदार शिंदे गटा सोबत आहेत. तसेच राज्यातील लाखो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यासोबतच एकनाथ शिंदेंनी राष्ट्रीय पातळीवर देखील पक्ष वाढवण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्रिपुरा राज्यप्रमुख देवेंद्र प्रसाद यांनी शनिवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यावेळी यावेळी शिवसेनेचे सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ उपस्थित होते.