‘ठाकरे’ चित्रपटाला सेन्सॉरची भीती नाही - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे, लिखाण आणि व्यंग्यचित्रे कधीच सेन्सॉरच्या कात्रीत अडकली नाहीत, त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटही सेन्सॉरच्या कचाट्यात अडकणार नाही; त्याला कोणत्याही सेन्सॉरची भीती वाटत नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. 

अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाचे हिंदी व मराठी ट्रेलर आज वडाळा येथील आयमॅक्‍स या मल्टिप्लेक्‍समध्ये प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे, चित्रपटाचे निर्माते संजय राऊत, दिग्दर्शक अभिजित पानसे, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी, अमृता राव, ‘वायकॉम १८’चे अजित अंधारे, निखिल साने व अन्य उपस्थित होते. शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’ अशा घोषणांनी चित्रपटगृह दणाणून टाकले.

‘ठाकरे’ चित्रपट फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात सुपरहिट ठरणार याची खात्री आहे, असा विश्‍वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. चित्रपटाच्या संपूर्ण चमूवर माझा पुरेपूर विश्‍वास आहे आणि ‘ठाकरे’चा ट्रेलर पाहून चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे, असे त्यांनी सांगितले. 

राज यांची झलक 
‘ठाकरे’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राज ठाकरे यांची झलक पाहायला मिळाली. एका दृश्‍यात राज आणि उद्धव यांच्या व्यक्तिरेखा दिसल्या.

Web Title: Thackeray Movie Sensor Sanjay Raut