
Shivsena News : CM एकनाथ शिंदे येणार गोत्यात? ठाकरे गटाच्या वकिलची मोठी खेळी
Shivsena News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुप्रिम कोर्टातल्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.
यावेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपने आमदारांवर कारवाई झाली असती तर आताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते असा युक्तीवाद त्यांनी केला.
आजही प्रथम ठाकरे गटाचे जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना शिंदे गटाला कोंडीत पकडलं आहे. ठाकरे गटाकडून बजावण्यात आलेल्या व्हीपचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं नाही. उत्तर न देण्याची ही चूक शिंदे यांना भोवण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांना व्हीप बजावला होता. बैठकीलाही बोलावलं होतं. अधिकृत मेलवरून 22 जून रोजी व्हीप बजावला होता. परंतु शिंदे बैठकीला आले नाहीत. बैठकीला का आले नाही? याचं उत्तरही शिंदे यांनी दिलं नाही.
त्यांचे आमदारही आले नाहीत. शिंदेंना हा व्हीप लागू होता. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी व्हीपचं उल्लंघन केला असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोमर अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज दुसऱ्या दिवशी सुनावणी सुरू झाली. यावेळी कपिल सिब्बल यांनी कालचा युक्तिवाद आज पुन्हा सुरू ठेवला. यावेळी विधीमंडळ गटनेतेपद, मुख्यप्रतोद आणि शिवसेना नेतेपदाची निवड यावर कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे.
यावेळी कपिल सिब्बल यांनी गटनेते आणि प्रतोद कसे निवडतात याचं वाचन केलं. त्यावर कोर्टानेही काही महत्वाच्या टिप्पणी केल्या आहेत.