Nitin Gadkari : "नितीन गडकरी यांची भाजपमध्ये घुसमट?"

नितीन गडकरी यांना भाजपमध्ये साईडलाईन करण्यात आल्याच्या चर्चा
Nitin Gadkari
Nitin Gadkari Esakal

शिवसेनेत फुट पडल्यापासून आणि दोन गट निर्माण झाल्यापासून दोनह गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसू येतात. तर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत स्थापन केलेल्या सत्तेवरही टीका करण्यात आली आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपमध्ये खूप मोठी घुसमट होत असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

तर त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला बोललेलं वाक्य मी कधीही सार्वजनिकरित्या बोलणार नाही, असं सूचक वक्तव्यही खैरेंनी यावेळी केलं आहे. चंद्रकांत खैरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Nitin Gadkari
Balasaheb Thorat : 'मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितलं?’ काय म्हणाले बाळासाहेब थोरात

आम्ही एनडीएत होतो. मोदी पंतप्रधान होते. तेव्हा भाजपच्या एकाही मंत्र्यांला काम करण्याचा अधिकार नव्हता. नितीन गडकरी यांना काही काम सांगितलं तर ते करायचे. त्यांच्याकडे मी जिल्ह्याचं एक काम घेऊन गेलो होतो. पाच सहा महिन्यानंतर परत लोकसभेत विचारलं कामाचं काय झालं? काम सुरू झालं नव्हतं. त्यावर गडकरी यांचं एक वाक्य होतं. ते मी बोलू शकत नाही असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

Nitin Gadkari
Soniya Gandhi: काँग्रेस महाअधिवेशनात सोनियांचा हल्लाबोल; राहुल यांच्या ‘भारत जोडो’चे कौतुक

तर पुढे बोलताना म्हणाले की, त्यांना इतकं भाजपमध्ये साईड लाईन केलं होतं. गडकरींना साईडलाईन करून आमच्या मराठवाड्याचं नुकसान करण्यात आलं, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरे यांच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com