ठाणे रेल्वे स्थानक स्वच्छच! 

किशोर कोकणे 
मंगळवार, 12 जून 2018

ठाणे : देशातील सर्वांत अस्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत ठाण्याचे नाव आल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर आहे. मात्र, ठाणे स्थानकाचे या यादीत चुकीने नाव आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. यासाठी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात अवघ्या तीनच टक्के नागरिकांनी ठाणे रेल्वे स्थानकाला अस्वच्छ ठरवल्याचे उघड झाले आहे. मात्र, या अहवालानंतर स्वच्छतेविषयी अधिक काळजी घेण्यात येत असल्याने प्रवाशांना फायदा होत आहे. 

रेल्वे प्रशासनातर्फे काही दिवसांपूर्वीच ठाणे रेल्वेस्थानक हे देशातील आठव्या क्रमांकाचे सर्वांत अस्वच्छ स्थानक असल्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालानंतर प्रवाशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. या अहवालात चुकीने ठाण्याचे नाव आल्याचे उघड झाले आहे. रेल्वेने 18 ते 24 मेदरम्यान केलेल्या सर्वेक्षणात प्रवाशांच्या प्रतिक्रिया दूरध्वनीवरून घेतल्या होत्या. त्याआधारे तयार केलेल्या अहवालानुसार ठाणे रेल्वेस्थानक अस्वच्छतेच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर होता. ठाणे रेल्वेस्थानकातून रोज 4 ते 5 लाख प्रवासी ये-जा करतात. नेहमी गजबलेले स्थानक म्हणून ओळख असलेल्या ठाण्याचे नाव अस्वच्छतेच्या यादीत आठव्या क्रमांकावर आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. 

ठाणे स्थानकाबद्दल 80 टक्के प्रवाशांनी "ठीक', 15 टक्के प्रवाशांनी "सुंदर' आणि तीन टक्के प्रवाशांनी "वाईट', तर 2 टक्के प्रवाशांनी काहीच प्रतिक्रिया दिली नसल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अवघ्या तीन टक्के प्रवाशांच्या प्रतिक्रियेवरून ठाणे स्थानकाला अस्वच्छ ठरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

असा बनवला अहवाल 
प्रवाशांना फोन करून त्यांच्याकडून प्रतिक्रिया मागविण्यात आल्या. त्यानंतर या अहवालातून देशातील 10 अस्वच्छ स्थानके समोर आली होती. यात कल्याण तिसरे तर ठाणे आठवे अस्वच्छ स्थानक होते. 
 
Web Title: Thane railway station clean