केदार दिघेच्या अडचणीत भर; मुंबई पोलिसांनी बजावलं समन्स| Thane Shiv Sena president Kedar Dighe has been summoned by Mumbai Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Kedar Dighe

केदार दिघेच्या अडचणीत भर; मुंबई पोलिसांनी बजावलं समन्स

शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या अडचणीत भर पडली आहे. दिघे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं आहे. बलात्कार प्रकरणातील पीडित व्यक्तीला धमकावण्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपामध्ये केदार यांची चौकशी होणार आहे. केदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.(Thane Shiv Sena Kedar Dighe has been summoned by Mumbai Police)

मुंबईत ना म जोशी मार्ग पोलिस स्टेशन मध्ये बलात्कार पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केदार दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लोअर परळ मधील सेंट रेगीज हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित तरूणीने तक्रार करु नये म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावल्याचा आरोप केला आहे.

केदार दिघे हे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी होते. मानसपुत्रावत त्यांनी एकनाथ शिंदेंना सांभळलं होतं. एकनाथ शिंदे आनंद दिघेंना आपले राजकीय गुरू मानतात.

Web Title: Thane Shiv Sena President Kedar Dighe Has Been Summoned By Mumbai Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..