ठाण्यातील तरुण इसीसमध्ये; भावाची तक्रार

पीटीआय
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

ठाणे - ठाण्यामधून एक तरुण इसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी भारताबाहेर गेला असल्याची धक्‍कादायक माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे. याबाबत संबंधित तरुणाच्या भावानेच तक्रार दाखल केली आहे.

ठाणे - ठाण्यामधून एक तरुण इसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी भारताबाहेर गेला असल्याची धक्‍कादायक माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे. याबाबत संबंधित तरुणाच्या भावानेच तक्रार दाखल केली आहे.

तरबेज नूर मोहम्मद तांबे (वय 28) हा तरुण इसीसमध्ये गेल्याची तक्रार त्याच्या भावाने मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाकडे केली आहे. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी पीटीआयशी बोलताना माहिती दिली. सौदी अरेबियात काम करणाऱ्या अली नावाच्या मित्रासह तरबेज इसीसमध्ये भरती होण्यासाठी इजिप्त आणि लिबियाला गेला असल्याची तक्रार त्याच्या भावाने दिली आहे. सौदी अरेबियातील रियाधमध्ये असलेल्या अली नावाच्या मित्राशी तरबेज गेल्या काही वर्षांपासून संपर्कात होता. तरबेज नोकरीच्या निमित्ताने जातो असे सांगून इजिप्तला गेला असून त्यानंतर अद्यापपर्यंत त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

देशातील विविध भागातून राष्ट्रीय तपास संस्थेने इसीसच्या 68 समर्थकांना ताब्यात घेतल्याची माहिती मागील महिन्यात लोकसभेत देण्यात आली होती. तरुणांना आकर्षित करण्यसाठी इसीस सोशल मिडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे.

Web Title: Thane youth for joining ISIS