
Mahavikas Aghadi: राष्ट्रवादी आगामी काळातील 'ही' विधानसभा निवडणूक लढणार स्वबळावर
Maha Vikas Aghadi News: राज्यात भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. मात्र येत्या काळात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र लढणार की वेगवेगळी लढणार असा प्रश्न समोर आला आहे.
मागील काळात राज्यातील सर्व निवडणुका मविआ आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढलले होते. मात्र आता राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे.
आगामी काळात पुरंदर विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.
ऐवढच नाही तर आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका देखील स्वबळावर लढविण्याचा निर्णय पुरंदर तालुका राष्ट्रवादीने घेतला आहे.
पुरंदर तालुका राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं की, ग्रामीण भागत राष्ट्रवादीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीसाठी ते फायदेशीर ठरू शकते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे..
दरम्यान राष्ट्रवादीने पुरंदर विधानसभा स्वबळावर लढल्यास महाविकास आघाडी म्हणून ही जागा काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन लढणार की हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार अशी जोरदार चर्चा आहे.
मागील विधानसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसचे संजय जगताप यांनी पराभूत केले होते.