राज्यातील चित्रपटगृहमालक मेटाकुटीला; काय आहे परिस्थिती पहा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे बंद होऊन तब्बल सहा महिने झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये काहीही उत्पन्न नसल्यामुळे हा व्यवसाय पूर्णतः कोलमडला आहे. आता हा व्यवसाय सावरायचा असेल तर सरकारने अन्य व्यवसायांप्रमाणे लवकरात लवकर चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी सिंगल स्क्रीन तसेच मल्टिप्लेक्‍सचालकांकडून केली जात आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील चित्रपटगृहे बंद होऊन तब्बल सहा महिने झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये काहीही उत्पन्न नसल्यामुळे हा व्यवसाय पूर्णतः कोलमडला आहे. आता हा व्यवसाय सावरायचा असेल तर सरकारने अन्य व्यवसायांप्रमाणे लवकरात लवकर चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी सिंगल स्क्रीन तसेच मल्टिप्लेक्‍सचालकांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे महाराष्ट्रातील सगळी चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय सरकारने मार्चमध्ये घेतला. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये चित्रपटगृहे सुरू होतील, असे वाटले होते; परंतु दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत गेला आणि चित्रपटगृहे लवकर सुरू होण्याची आशा मावळली. मध्यंतरी सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात चित्रपटगृहे सुरू होतील, अशी चर्चा रंगली होती; परंतु आता तब्बल २५ आठवडे झाले आहेत. एकप्रकारे चित्रपटगृह बंद ठेवण्याचा रौप्यमहोत्सव झाला आहे आणि अजूनही सरकारने कोणताही निर्णय याबाबतीत घेतलेला नाही. त्यामुळे आता सरकार या व्यवसायाबाबत कधी निर्णय घेणार याकडे थिएटरचालक आणि अन्य मंडळींचे लक्ष लागले आहे.

पूर्वजांच्या स्मरणार्थ द्या मदतीचा हात!; कोरोना मदत प्रकल्पासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून आवाहन

सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्‍झिबिटर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले, की गेल्या सहा महिन्यांमध्ये एक पडदा चित्रपगृहचालकांचे  अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने अन्य व्यवसायाप्रमाणे चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी द्यावी. कोरोनावर औषध आल्यानंतर चित्रपटगृहे सुरू करणार की कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आल्यानंतर सुरू करणार? सरकारने याबाबतीतील आपली भूमिका लवकर स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. 

'डायमंड क्रॉसिंग' बघितले आहे का? देशातील एकमेव हिऱ्यासारखा दिसणारा रेल्वेमार्ग; वाचा सविस्तर 

तारीख लवकर जाहीर करावी
सरकारने चित्रपटगृहे कधी उघडायची याची तारीख तरी जाहीर करावी; कारण तारीख जाहीर झाल्यानंतर चित्रपटगृहांची डागडुजी करावी लागणार तसेच सरकारची नियमावली असणार आहे. त्याची तयारी करावी लागणार तसेच अन्य काही कामे असणार आहेत. याकरिता पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर तारीख जाहीर करावी, अशी मागणी मल्टिप्लेक्‍स असोसिएशनचे सचिव प्रकाश चाफळकर यांनी केली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theater closed by corona virus