
Gunaratna Sadavarte: वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयात चोरी, पोलिसात गुन्हा दाखल
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयात चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Theft at the office of lawyer Gunaratna Sadavarte )
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ही घटना घडली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून एसी, टीव्ही, वॉशिंग मशीनची चोरी करण्यात आली आहे. एकून 4 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या चोरीच्या मागे टोळी असल्याचा सदावर्ते यांचा आरोप आहे. वागळे पोलिसांचा तपास सुरु आहे.
या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र डायमंड गँग वगैरे सक्रिय असल्याच्या सदावर्ते यांच्या आरोपांत तथ्य नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
तरी सुद्धा याबाबतीत अधिक चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वागळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली आहे.
जुनी पेंशन आंदोलनात गुणरत्न सदावर्ते सहभाग नोंदवल्याने सध्या ते चर्चेत आहेत. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, शिक्षण यंत्रणा कोलमडून पडली आहे.
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या काळात अशा प्रकारे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारणं योग्य नाही. त्यामुळे कोर्टाने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांची याचिका दाखल करून घेतली आहे.