जयंत पाटलांनाही भाजपमध्ये घेऊ- दानवे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

दुसऱ्या पक्षात अनेक चांगली माणसे आहेत. ती घेण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वैयक्तिक चांगले आहेत. जयंत पाटील भाजपमध्ये आले तर आम्ही त्यांनाही पक्षात घेऊ, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

मुंबई- दुसऱ्या पक्षात अनेक चांगली माणसे आहेत. ती घेण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वैयक्तिक चांगले आहेत. जयंत पाटील भाजपमध्ये आले तर आम्ही त्यांनाही पक्षात घेऊ, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

दानवे पुढे म्हणाले की, चार नंबरवरचा आमचा पक्ष राज्यात एक नंबर वर आहे, या 5 वर्षात मोठे जाळे आम्ही तयार केले आहे. एवढे मोठे यश पाहून विरोधक घाबरले आहेत. परत भाजपला पाच वर्ष सत्ता मिळाली तर 50 वर्ष आम्हाला सत्ता मिळणार नाही. या भीतीपोटी विरोधक एकत्र येत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

मायावतींनी आपले आपले अस्तित्व टिकवण्यासाठी युती केली आहे. कोणी कितीही विरोधक एकत्र आले तरी भाजप स्वबळावर निवडणूक लढवून विजयी होईल, असा विश्वास त्यांनी शिवसेनेला टोला लगावताना व्यक्त केला. अमित शहा यांच्या शब्दाचा अर्थ असा आहे की, जे राजकीय पक्ष एकत्र येतील त्यांना बोलले आहेत. शहा कुठल्या एका पक्षाला बोलले नसल्याचेही दानवे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Then Jayant Patil coming in BJP says Danave