...तर 'ठाकरे' प्रदर्शित होऊ देणार नाही; संभाजी ब्रिगेडचा इशारा

वृत्तसंस्था
शनिवार, 19 जानेवारी 2019

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बहुचर्चित "ठाकरे' या चित्रपटात संभाजी महाराज यांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ तो प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने आज दिला. 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविरोधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बहुचर्चित "ठाकरे' या चित्रपटात संभाजी महाराज यांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ तो प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने आज दिला. 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविरोधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

नुकताच "ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना नायकाच्या पायात पांढऱ्या रंगाची चप्पल आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने या दृश्‍याला आक्षेप घेतला असून, हा संभाजी महाराजांचा अवमान असल्याचा संताप व्यक्‍त केला आहे.

Web Title: then Thackeray will not be Release Sambhaji Brigade Warning