शिवसेनेशी युतीबाबत चर्चा झाली नाही : दानवे

शिवसेनेशी युतीबाबत चर्चा झाली नाही : दानवे

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत युती होणार की नाही यावरून चर्चा सुरु असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप-सेना युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे सांगितले.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-सेना पुन्हा एकत्र आले आणि राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता आगामी निवडणुकीत भाजप-सेना युतीबाबत दानवे यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ''मागील विधानसभा निवडणुकीत दोन दिवस अगोदर भाजप-सेनेची युती तुटली. त्यामुळे अद्याप केवळ चर्चा सुरू आहे. मात्र, युतीबाबत शिवसेनेला कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही''.

तसेच ते पुढे म्हणाले, ''मागील विधानसभा निवडणुकीत दोन दिवस अगोदर आमची युती तुटली. त्यामुळे अद्याप केवळ चर्चा सुरू आहे. मात्र, युतीबाबत शिवसेनेला कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com