सहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यात नव्या सभासदांना कर्ज नाही 

There is no loan to new members in the Co-operative district
There is no loan to new members in the Co-operative district

सोलापूर : जूनपासून सुरू झालेल्या खरीप हंगामासाठी जिल्हा अग्रणी बॅंकेकडून देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 27 बॅंकांकडून 600 कोटी वितरित झाले आहेत. परंतु, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याच जिल्ह्यात एकाही नव्या सभासद शेतकऱ्याला कोणत्याही बॅंकेकडून पीककर्ज देण्यात आले नाही तर पाच बॅंकांचे कर्जवाटपच अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. त्यामध्ये पंजाब नॅशनल, युनायटेड बॅंक, बंधन आणि इन्डसइंड या बॅंकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली. 

मुख्यमंत्री, सहकारमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही काही बॅंकांचे कर्जवाटप अद्यापही सुरू झालेले नाही. दुसरीकडे कर्जवाटप केलेल्या बॅंकांनी एकाही नव्या सभासदाला कर्ज दिलेले नाही. नियमित अथवा कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाच बॅंका कर्ज देत आहेत. मध्यम मुदतीचे कर्ज अथवा नवे-जुने केलेल्या कर्जाची रक्‍कमही कर्जवाटपात बॅंका धरतात आणि उद्दिष्टानुसार कर्जवाटप करत असल्याचे भासवतात, अशी चर्चा आहे.

त्यामुळे खरीप अथवा रब्बी हंगामात नव्याने किती शेतकऱ्यांना बॅंकांकडून कर्ज देण्यात आले, याची माहिती घेण्याची गरज आहे. कित्येक वेळा बॅंका त्यांच्या विश्‍वासू खातेदारांनाच मोठ्या प्रमाणावर कर्ज देतात, असेही बोलले जाते. शेतकऱ्यांना खासगी सावकारीच्या जाचातून मुक्‍त करण्याकरिता बॅंकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. दुसरीकडे घेतलेले कर्ज वेळेत फेड करण्याची प्रमुख जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. 

आकडे बोलतात... 

बॅंकनिहाय कर्जवाटपाचे उद्दिष्ट 

(राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंका) 
शेतकऱ्यांचे उद्दिष्ट 
75,943 

कर्जवाटपाचे उद्दिष्ट 

1041.79 कोटी

कर्ज मिळालेले शेतकरी 

26,431 

बॅंकांनी केलेले कर्जवाटप 

425.76 
(जिल्हा मध्यवर्ती बॅंक) 
शेतकऱ्यांचे उद्दिष्ट 

67,631 

कर्जवाटपाचे उद्दिष्ट

284.79 कोटी 

कर्ज मिळालेले शेतकरी

21,660 

कर्जवाटप झालेली रक्‍कम

160.07 कोटी

(विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक) 
शेतकऱ्यांचे उद्दिष्ट 

6,975 

कर्जवाटपाचे उद्दिष्ट 

60.29 कोटी 

कर्ज मिळालेले शेतकरी

1,299 

कर्जवाटप झालेली रक्‍कम 

17.42 कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com