महाराष्ट्रात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड, महाराष्ट्र तिसऱ्या स्टेजला ? स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोना स्टेजबाबत माहिती दिलीये.

मुंबई - महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोना स्टेजबाबत माहिती दिलीये. नागरिकांकडून आता सातत्याने एक प्रश्न विचारला जात होता, तो म्हणजे कम्युनिटी स्प्रेड बाबत. म्हणजेच महाराष्ट्रात कोरोना तिसऱ्या स्टेजला गेलाय का? यावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठा खुलासा केलाय. राजेश टोपे यांच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात अजूनही तिसरी स्टेज आलेली नाही. म्हणजेच महाराष्ट्रात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही. ANI वृत्तसंस्थेशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीये. 

सध्या कोरोनाचं निदान होणारे बहुतांश लोकं हे होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेल्यांपैकी आहेत. कोरोना पॉझिटिव्ह म्हणून डिटेक्ट होणाऱ्या काही रुग्णांना कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याची हिस्ट्री आहे. म्हणूनच महाराष्ट्रात अजूनही कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही, असं स्पष्टपणे राजेश टोपे म्हणालेत.

मोठी बातमी - तज्ज्ञ सांगतायत जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोना माजवणार हाहाकार,रुग्णसंख्या 'इतकी' वाढू शकते.. 

सोबतच राजेश टोपे यांनी प्लाझ्मा थेरेपीबद्दल देखील मोठं आणि महत्त्वाचं विधान केलंय. प्लाझ्मा थेरेपीमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊ शकतात. दहा पैकी नऊ रुग्ण हे प्लाझ्मा थेरेपीमुळे बरे होऊ शकतात. सोबतच ते हेही म्हणालेत की, येत्या दोन दिवसात रेमडेसिवीर (Remdesivir) आणि फॅवीपिरावीर (Favipiravir) ही सध्या कोरोना रुग्णावर वापरण्यात  येणारी औषधे सर्वांसाठी उपलब्ध होणार आहेत.  

मोठी बातमी 'हे' शहर आज सायंकाळी 5 पासून थेट 12 जुलैपर्यंत थांबणार ! कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आयुक्तांचे निर्देश 

theres no community spread in the state as of now says Maharashtra Health Minster Rajesh Tope

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theres no community spread in the state as of now says Maharashtra Health Minster Rajesh Tope