पुणे झेडपीचे हे तीन उपक्रम आता राज्यभर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

पुणे जिल्हा परिषदेने यंदा प्रथमच राबविलेल्या घर घर गोठा, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेली खासगी कंपनी या तीन उपक्रमांची राज्याच्या ग्रामविकास खात्याने दखल घेतली आहे. हे तीनही उपक्रम केंद्र पुरस्कृत विविध योजनांच्या निधीच्या माध्यमातून अंमलात आणण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे झेडपीचा हाच  पॅटर्न राज्यभर लागू करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.

पुणे - पुणे जिल्हा परिषदेने यंदा प्रथमच राबविलेल्या घर घर गोठा, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेली खासगी कंपनी या तीन उपक्रमांची राज्याच्या ग्रामविकास खात्याने दखल घेतली आहे. हे तीनही उपक्रम केंद्र पुरस्कृत विविध योजनांच्या निधीच्या माध्यमातून अंमलात आणण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे झेडपीचा हाच  पॅटर्न राज्यभर लागू करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यानुसार या तीनही योजनांची सखोल माहिती घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे स्वत: या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचे सादरीकरण पाहणार आहेत. हे सादरीकरण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांना मंत्रालयात आमंत्रित करण्यात आले आहे. येत्या ९ सप्टेंबरला हे सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी दरम्यान, यासाठी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, उपसचिव, रोजगार हमी योजना विभागाचे उपसचिव आणि पंचायतराज विभागाच्या उपसचिवांना आमंत्रित करण्यात आले आहे. ९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात हे सादरीकरण होणार असल्याचे मुश्रीफ यांचे खासगी सचिव रवींद्र पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेला बुधवारी (ता.२) पत्राद्वारे कळविले आहे.

प्रवासी पासला मुदतवाढ देण्याबाबत पीएमपीने घेतला मोठा निर्णय; वाचा सविस्तर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारांना रोजगार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांसाठी गोठे उपलब्ध करून देणे, अशा दुहेरी उद्देशाने घर घर गोठा हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. यासाठी केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गोठ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे झाडे लावण्यासही प्रोत्साहन मिळाले आहे.

Video : अखेर पुणेकरांची इच्छा झाली पूर्ण; तब्बल पाच महिन्यांनी केला 'पीएमपी'तून प्रवास!

त्यानंतर चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी एक अँब्युलन्स खरेदी करण्यात आली आहे. यामुळे सर्व आरोग्य केंद्रांना हक्काच्या नव्या कोऱ्या अँब्युलन्स मिळालेल्या आहेत. यासाठी प्रती अँब्युलन्स २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

याशिवाय जिल्ह्यातील गावां-गावातील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी पुणे जिल्हा परिषदेने स्वतंत्र खासगी व विश्र्वस्त कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीला परवानगी मागणारा प्रस्ताव नुकताच ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या या तीनही उपक्रमांची प्राथमिक माहिती मुश्रीफ यांनी घेतली आणि त्यानंतर हे उपक्रम राज्यभर राबविण्यात येतील का, याची चाचपणी सुरू केली. यासाठी या विषयावर खास सादरीकरण ठेवण्यात आले आहे.

रेल्वेरुळाभोवतीच्या झोपड्या तीन महिन्यांत हटवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश​

पुणे जिल्हा परिषदेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या तीन नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण येत्या ९ सप्टेंबरला करण्याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला कळविले आहे. याबाबतच्या पत्रात घरघर गोठे, अँब्युलन्स खरेदी आणि खासगी कंपनी या उपक्रमांचा खास उल्लेख करण्यात आला आहे. 
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These three activities of Pune ZP are now statewide