संतांची जीवनमूल्ये शिक्षणात रुजवणार : तावडे 

They will apply the values of saints in education says Tawde
They will apply the values of saints in education says Tawde

पुणे : संतांची जीवनमूल्ये शिक्षणात रुजविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी केले. 

राज्य सरकारतर्फे "ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' यंदा ज्येष्ठ कीर्तनकार किसनमहाराज साखरे यांना तावडे यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रेटो व रामकृष्ण महाराज लहवीतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पाच लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, उल्हास पवार उपस्थित होते. 

तावडे म्हणाले, ""संतांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही. त्यांच्या विचारांतील जीवनमूल्ये शिक्षण क्षेत्रात आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यातून सामाजिक समाजरचना सक्षम होण्यास मदत होईल. इंग्रजीप्रमाणे संस्कृत विषय पहिलीपासून सुरू करण्याचे काम आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सरकारने सुरू केले आहे.'' 

साखरे म्हणाले, ""संस्कृत तत्त्वज्ञानाला संत साहित्याच्या विचाराचा आधार मिळाल्याने ते जनसामान्यांपर्यंत अधिक पोचले. ते अधिक सोपे झाले. सरकारने पहिलीपासून इंग्रजी विषय सुरू केला. त्याच धर्तीवर सरकारने पहिलीपासून संस्कृत विषय सुरू करावा.'' 

या वेळी पंडिता मंजूषा पाटील तसेच पंडित रघुनाथ खंडाळकर, शुभम खंडाळकर यांचे गायन झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील मृदंगाचार्य जालिंदर बप्पा सस्ते वारकरी सेवा मंडळाच्या बालवारकऱ्यांनी काढलेल्या दिंडीने मने जिंकली. सूत्रसंचालन स्वामिराज भिसे यांनी केले. आभार संजीव पलांडे यांनी मानले. 

पुरस्काराची रक्कम सरकारला 

पहिलीपासून संस्कृत विषय सुरू करण्याबाबत साखरे यांनी तावडे यांना काही सूचना केल्या. संस्कृत विषयाच्या संशोधन आणि संवर्धनासाठी साखरे यांनी मिळालेल्या पुरस्कारातील पाच लाखांमध्ये एक लाख टाकून सहा लाख रुपये सरकारला परत केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com