चोरट्यांनी पाळला माणुसकीचा धर्म

सुनील गर्जे  
मंगळवार, 12 जून 2018

नेवासे : घराबाहेर पहाटेच्या गाढ झोपेत असलेल्या एका ज्येष्ठाला अचानक समोर दिसलेले चोर व त्यांच्याकडून झालेल्या मारहाणीने रक्तदाब वाढला. ते अस्वस्थ झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी क्षणाचाही विलंब न करता ज्येष्ठावर "मसाज थेरपी'चा प्रथमोपचार करीत त्यांचा संभाव्य धोका टाळला. यानिमित्त चोरट्यांमधील माणुसकीचा ओलावा त्या कुटुंबाला पाहायला मिळाला. मात्र, चोरट्यांनी माणुसकीबरोबरच आपल्या धंद्याचाही "धर्म' पाळत, रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले. 

नेवासे तालुक्‍यातील अंतरवली येथे काकासाहेब वाबळे (वय 61) व त्यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे वस्तीवरील घराबाहेर झोपले होते. शनिवारी (ता. 9) वस्तीवर आलेल्या चोरांना पाहून ते घाबरून ओरडणार, तोच एका चोरट्याने त्यांच्या मानेवर मारले. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास असलेल्या काकासाहेबांची बोबडी वळली, हात-पाय वाकडे झाले. त्यांची अवस्था पाहून चौघांपैकी दोन चोरट्यांनी काकासाहेबांचे तळहात- पाय, छाती व डोक्‍याला पंधरा मिनिटे मालिश (मसाज थेरपी) करत त्यांना शुद्धीवर आणले. 

हा सर्व प्रकार त्यांचे घाबरलेले कुटुंबीय घरातून पाहत होते. शुद्धीवर आलेल्या काकासाहेबांनी आपला मुलगा अमोल याला, घरात जे काही असेल ते चोरट्यांना देऊन टाक, असे सांगितले. दरम्यान, चोरट्यांनी अमोलच्या आईला, "तुम्हीही आजारी आहे का,' अशी विचारणा करत आरोग्याची चौकशीही केली. मात्र, आपल्यातील माणुसकीबरोबरच त्यांनी चोरीचे "कर्तव्य'ही पार पाडले. 

वडिलांना रक्तदाबाचा त्रास आहे. अचानक उद्‌भवलेल्या स्थितीमुळे हात-पाय वाकडे होत ते बेशुद्ध पडले. चोरट्यांनीच हातापायांना मालिश करत त्यांना शुद्धीवर आणले. 
- अमोल वाबळे, काकासाहेबांचा मुलगा 

Web Title: The thieves keep the humanity