#MarathaKrantiMorcha तिसऱ्या दिवशीही रास्ता रोको, दगडफेक

#MarathaKrantiMorcha  तिसऱ्या दिवशीही रास्ता रोको, दगडफेक

पुणे -  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिसऱ्या दिवशीही गुरुवारी राज्यातील अनेक भागांत रास्ता रोको, रेल रोको आंदोलन तसेच जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले. 

सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी नवी मुंबई व ठाण्यातील बंद मागे घेतल्याची घोषणा बुधवारी दुपारी केल्यानंतरदेखील हिंसक घटना घडत होत्या. आमच्या आंदोलनाआडून काही समाजकंटक हिंसक घटना घडवत असावेत, असा संशय पवार यांनी व्यक्त केला. तसेच, आंदोलनात समाजविघातक प्रवृत्ती घुसल्याचा संशय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील व्यक्त केला. 

पुणे भुसावळ रेल्वे रोखली
 नवी मुंबई, ठाण्यात गुरुवारी सकाळीदेखील आंदोलन सुरूच होते. सिंधुदुर्गात गुरुवारी आंदोलकांनी मुंबई-गोवा मार्गावर अडथळे उभारले होते. लोणावळ्याजवळ पुणे-भुसावळ रेल्वे रोखण्यात आली. मनमाडलादेखील रेल रोको आंदोलन झाले. पुण्यातील वारजे भागात रास्ता रोको करताना आंदोलकांना अटक करण्यात आली. 

सांगलीत हिंसक वळण
सांगलीतील शिराळा तालुक्यात बंदला हिंसक वळण लागल्याने एक बस पेटविण्यात आली.इस्लामपूर-ताकारी मार्गावर तीन एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. आत्महत्येचा प्रयत्न आरक्षणासाठी मराठवाड्यात आणखी एका आंदोलकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रशांत सवराते (रा. आलेगाव, जि. परभणी) या तरुणाने विष प्राशन केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जालना, परभणीत आंदोलकांनी दगडफेक केली. परभणी येथे दगडफेकीत  पोलिस जखमी झाले. 

पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे
आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा देण्यासाठी भाजपचे आमदारच नव्हे, तर पक्षीय पदाधिकारीदेखील राजीनामे देऊ लागले आहेत. भाजपचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी  राजीनामा दिला. माजलगाव पंचायत समिती उपसभापती सुशील साळुंके, तर जालन्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी पदाचे राजीनामे दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com