"आरटीई'साठी आज तिसरी सोडत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

राज्यातील खासगी शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) असलेल्या 25 टक्के राखीव जागांसाठी तिसरी सोडत उद्या (ता. 10) काढण्यात येणार आहे. याद्वारे प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेत 11 ते 18 जुलै रोजी प्रवेश घेता येणार आहेत. 

पुणे - राज्यातील खासगी शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) असलेल्या 25 टक्के राखीव जागांसाठी तिसरी सोडत उद्या (ता. 10) काढण्यात येणार आहे. याद्वारे प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेत 11 ते 18 जुलै रोजी प्रवेश घेता येणार आहेत. 

सोडत झाल्यानंतर ज्यांना प्रवेश मिळाला आहे, त्यांना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून "एसएमएस' पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांनी प्रवेशाच्या संकेतस्थळावर जायचे आहे. त्यात "ऍप्लिकेशनवाइज डिटेल'मध्ये अर्ज क्रमांक टाकायचा असून, सोडतीत प्रवेश मिळाला का नाही, याची शहानिशा करायची आहे. प्रवेश निश्‍चित झाला असल्यास तेथे जाऊन प्रवेश घ्यायचा आहे, असे शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) हारून अत्तार यांनी कळविले आहे. 

राज्यभरातील खासगी शाळांमध्ये सुमारे एक लाख 16 हजार जागा आहेत. यातील एक लाख दोन हजार विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये प्रवेश मिळाला आहे; परंतु यातील केवळ 67 हजार जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यामुळे तिसरी सोडत ही 49 हजार जागांसाठी होईल, असे अत्तार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third lottery for RTE today