तिसऱ्या टप्प्यात कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

मुंबई : नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा तिसरा टप्पा आज शांततेत पार पडला. या टप्प्यात 19 नगरपालिका व 2 नगरपंचायतीसाठी 66 टक्के मतदान झाले. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपालिकांचा समावेश असून, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, बिलोली, मुदखेड, कंधार, कुंडलवाडी, हदगाव, धर्माबाद, उमरी या नगरपालिकांमध्ये आज मतदान झाले. तर, माहूर व अर्धापूर या दोन नगरपंचायतींसाठी देखील आज मतदान झाले.

यासोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पैठण, गंगापूर व खुल्ताबाद नगरपालिकांचे भवितव्यही मतपेटीत बंद झाले. तिसऱ्या टप्प्यात विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी, भंडारा, तुमसर व साकोली तर गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली व देसाईगंज या नगरपालिकेसाठी मतदान झाले.

Web Title: third phase of elections