‘थर्टी फर्स्ट’ थंडीच्या कडाक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - उत्तर भारताप्रमाणेच राज्यातही यंदा थंडीच्या कडाक्‍यातच ‘थर्टी फर्स्ट’ साजरा होणार आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील चोवीस तास थंडीचा कडाका कायम रहाणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने रविवारी (ता. ३०) दिला आहे. राज्यात सर्वांत नीचांकी किमान तापमान नागपूर येथे ४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. जम्मू आणि काश्‍मीरसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील बहुतांश भागात किमान तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले आहे. तेथून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहात आहेत.

त्याचा थेट परिणाम राज्यावर होत असल्याने मध्य महाराष्ट्रसह विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा घसरला आहे. उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव पुढील आठवडाभर कायम रहाणार असल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातही राज्यातील थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. राजस्थानच्या भिलवाडा येथे ०.६ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Web Title: Thirty First Cold