ऐनवेळेस माघार घेण्याची राज ठाकरेंची ही पहिलीच वेळ नाही

2014 पासून अनेकदा राज ठाकरेंनी आपले निर्णय बदललेले
Raj Thackeray
Raj ThackerayE sakal

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ५ जूनचा नियोजित अयोध्या दौरा रद्द केलाय. प्रकृतीचं कारण देत त्यांनी हा दौरा रद्द केलाय. पण ते पुण्यात २२ मे ला सभा घेऊन याविषयीचं बोलतील, असं सांगण्यात येतंय.दरम्यान संजय राऊतांनी ''आपल्याला माध्यमातूनच याविषयीची माहिती समजल्याचं म्हणत जर राज ठाकरेंना मदतीची गरज असेल तर आम्ही दिली असती. तिकडे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने नेहमीच शिवसेनेचं स्वागत केलंय. काय अडचण आहे माहित नाही, पण भाजपाने त्यांच्यांशी असं वागायला नको होतं'' , असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय.

राज ठाकरेंच्या दौऱ्याला यूपीत विरोध-

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे मात्र १५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तरप्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंग यांनी विरोध केला होता. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय. अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली होती. दरम्यान राज ठाकरेंनी नियोजित अयोध्या दौरा रद्द केलाय. या दौऱ्यांची मोठी तयारी करण्यात आली होती. रेल्वे देखील बूक करण्यात आल्या होत्या. मात्र राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला.

राज ठाकरे देणार पुण्यातल्या सभेत उत्तर-

पुण्यातील २२ मे रोजी होणाऱ्या सभेत राज ठाकरे अयोध्या दौऱ्याविषयी बोलतील असं सांगण्यात येतंय. राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना पुण्यातील सभएला उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय.पण प्रकृती अस्वास्थ्यामुळेच हा दौरा रद्द केल्याचं सांगत असले तरी, अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशात होत असलेल्या विरोधामुळेच दौरा रद्द केल्याचं सांगितलं जातंय.

याआधी रद्द केलेले निर्णय-

राज ठाकरेंनी पहिल्यांदा एखाच्या ठरलेल्या गोष्टीविषयीची भूमिका बदललीय असं नाही. यापूर्वीही त्यांनी घेतलेले अनेक निर्णय ऐनवेळेस बदललेत.

मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती, मशिदीसमोर हनुमाम चालिसा पठणा करत आंदोलन करण्यात येत होते. तर ३ मे ला अक्षयतृतीया आणि रमजान ईदच्या दिवशी जागोजागी महाआरती घेण्यात येणार होती. मात्र ऐनवेळेस त्यांनी महाआरती कऱण्याचा कार्यक्रम रद्द केला होता. त्यांच्या यू- टर्ननंतर राजकिय चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान राज ठाकरेंच्या सभा आणि त्यांच्या कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे 'हिंदूजननायक' असा उल्लेख होऊ लागला, तसंच त्यांनी पांघरलेल्या भगव्या शालीची देखील चर्चा झाली होती

'ऐ दिल है मुश्कील' -

दहशतवाद्यांनी 'उरी' येथे केलेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांच्या, भारतात होणाऱ्या कार्यक्रमांना कडाडून विरोध केला होता. एवढंच नाही तर 'ऐ दिल है मुश्कील' या चित्रपटाला देखील विरोध केला होता. यात फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता असल्याने या चित्रपटाच्या रिलीजला विरोध करण्यात आला होता. मात्र चित्रपटाचे निर्माते महेश भट्ट, करण जोहर आणि राज ठाकरे यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी काही अटी घातल्या. त्यात पुन्हा पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करणार नाही, तसेच भारतीय सेनेच्या फंडाला पैसे दिले जातील अशा अटी मनसेने घातल्या, आणि 'ऐ दिल है मुश्कीलच्या सर्व अडथळे दूर झाले.

निवडणूक लढविण्याची घोषणा आणि नंतर निर्णय रद्द-

२०१४च्या लोकसभेत मनसेनं १० मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र मोदींच्या लाटेमुळे सगळ्या ठिकाणी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपण स्वत: विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यापूर्वी ठाकरे कुटुंबातील कोणीही निवडणूक लढविली नव्हती, त्यामुळे हा सगळीकडे चर्चेचा विषय ठरला होता. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. पण हा उत्साह जास्त दिवस टिकला नाही. कारण त्यांनी आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. आम्ही ठाकरे कुटूंब संपूर्ण महाराष्ट्रालाच मतदारसंघ मानतो, त्यामुळे कुठल्या मतदारसंघापुरते मर्यादित नाही. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे तसंच काका दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही निवडणूक लढविली नव्हती. '' मी निवडणूक लढविण्याचा विचार केला होता पण त्यानंतर बराच विचार केला. संपूर्ण महाराष्ट्रच मतदार संघ आहे असं म्हणत, निवडणूक लढविण्याविषयीचा निर्णय मात्र रद्द केला होता.

ईव्हीएम विरोधातील आंदोलनाची घोषणा-

२०१९ मध्ये देखील राज ठाकरेंनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली होती. EVM संदर्भात देखील त्यांनी मोठं आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या 'लाव रे तो व्हीडीओ' संदर्भातल्या सभाही गाजल्या होत्या. मात्र इडीने चौकशीला बोलाविल्यानंतर मात्र राज ठाकरे कुठेच दिसले नाही.

NRC आणि CAA -

NRC म्हणजेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि CAA म्हणजेच नागरिकता दुरुस्ती कायद्यासंदर्भात जानेवारी २०२० मध्ये भूमिका मांडली होती. त्यांनी NRC आणि CAA ला पाठिंबा दिला होता. पाकिस्तान आणि बांग्लादेशातून बेकायदेशीररित्या आलेल्यांना हाकला अशी मनसेची भूमिका आहे. पण नागरिकता दुरुस्ती कायद्याला मनसेचा विरोध असल्याची भूमिका मांडत आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला अशी सारवासारव केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com