पाच वर्षांत हजार अपहार

पाच वर्षांत हजार अपहार

मुंबई - देशातील नागरी सहकारी बॅंकांमध्ये मागील पाच आर्थिक वर्षांमध्ये गैरव्यवहारांची सुमारे एक हजार प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली. या प्रकरणांमध्ये एकूण २२० कोटी रुपयांचा गैरव्यहार झाल्याचेही बॅंकेने नमूद केले आहे. 

माहिती अधिकारात रिझर्व्ह बॅंकेने ही माहिती दिली. २०१८-१९ या आर्थिक वर्षात एकूण १२७ कोटी रुपयांचे १८१ गैरव्यवहार झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. २०१७-१८ मध्ये ९९ प्रकरणे, २०१५-१६ मध्ये १८७ प्रकरणे, २०१४-१५ मध्ये ४७८ गैरव्यवहार प्रकरणे झाली आहेत. २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीत एकूण ९७२ बॅंक गैरव्यवहार झाले आहेत.

रिझर्व्ह बॅंकेकडे गैरव्यवहार प्रकरणे नोंदवताना बॅंकांनी या प्रकरणांची गुन्हेगारी तक्रार पोलिसांत किंवा संबंधित   यंत्रणांकडे करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर या गैरव्यवहारांसाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी लक्षात घेऊन त्यांच्यावर अंतर्गत कारवाई करणेही आवश्‍यक असल्याचेही रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले. मात्र, बॅंकांमध्ये झालेल्या या प्रकरणांमध्ये नेमकी काय कारवाई करण्यात आली, यासंदर्भातील संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचेही बॅंकेने म्हटले आहे.

ठेवी ४.८४ लाख कोटींवर 
देशात मार्च २०१९ अखेर एकूण १ हजार ५४४ नागरी सहकारी बॅंका असून, त्यातील एकूण ठेवींचे मूल्य ४.८४ लाख कोटी रुपये आहे. यातील सर्वाधिक बॅंका महाराष्ट्रात असून, त्यांच्यातील ठेवींची रक्कम ३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्याखालोखाल गुजरातमध्ये २१९ बॅंका असून, त्यामधील ठेवी ५५ हजार १०२ कोटी रुपये; तर कर्नाटकात २६३ बॅंका असून, त्यामधील ठेवी ४१ हजार ९६ कोटी रुपयांच्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com