राज्यातील वनसंपत्ती धोक्‍यात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई - राज्यातील जंगलात गेल्या वर्षी लागलेल्या आगीमुळे तब्बल ३३ हजार ६७ हेक्‍टर जंगल जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षी लागलेल्या आगीचा तपशील जमविण्याची कार्यवाही वन विभागात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मुंबईतील गोरेगाव येथील आरेच्या जंगलात सोमवारी भीषण आग लागली. या आगीत जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर वन्य जिवांचेही हाल झाले आहेत. जवळपास चार किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेल्या या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी १०० जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.

अशा प्रकारे राज्यातील जंगलात गेल्या वर्षभरात ४६७५ आगीच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात तब्बल ३३,०६७ हेक्‍टर जंगल जळून खाक झाले आहे. जंगलांमध्ये आगीच्या घटनांची वन विभागाची ही आकडेवारी धक्कादायक आहे.

जंगलांमध्ये आग लागण्याच्या कारणांमध्ये जाणीवपूर्वक लावलेल्या वणव्याचेही प्रमाण जास्त आहे. एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून आपण कोट्यवधी रुपये झाडे लावण्यावर खर्च करतो, तर दुसरीकडे दर वर्षी लागणाऱ्या वणव्यात हजारो हेक्‍टर जंगल जळून खाक होते, यामुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधता धोक्‍यात आली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Threat of forest wealth in the state