रुग्णालयाच्या गच्चीवरच दारुच्या बाटल्या, कंडोमची पाकिटं अन्...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

बीड : एखाद्या चित्रपटात शोभेल असे चित्र बीड जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवर दिसून आले. यामुळे या रुग्णालयाचा सावळा गोंधळ समोर आला. हा धक्कादायक प्रकार आहे. रुग्णालयामधील वॉर्ड क्रमांत सहाच्या छतावरुन गुरुवारी मध्यरात्री दोन पुरुष आणि एका महिलेला अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

दरम्यान, रुग्णलयातील कर्मचाऱ्यांनी या तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र या तिघांनाही केवळ वरवर चौकशी करुन सोडून देण्यात आल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारी रुग्णालयामध्ये असा प्रकार झाल्यानंतरही पोलिसांनी या तिघांवर कोणतीही कठोर कारवाई न करता सोडून दिले आहे.

दरम्यान या रुग्णालयाच्या दोन इमारती आहेत. एकामध्ये ओपीडी आणि प्रशासकीय कारभार पाहिला जातो तर दुसऱ्यामध्ये रुग्णांना दाखल करुन घेण्याची सोय आहे. याच इमारतीमधील वॉर्ड क्रमांक सहाच्या जिन्यावरुन दोन पुरुष आणि एक महिला मध्यरात्रीच्या सुमारास गच्चीवर गेले. मद्यधुंद अवस्थेमध्ये हे तिघे अश्लील चाळे करु लागले. हा प्रकार एका रुग्णालय कर्मचाऱ्याला समजताच त्याने सुरक्षा रक्षकांना यासंदर्भात माहिती दिली.

तसेच त्यानंतर रुग्णालय कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक बॅटरी घेऊन गच्चीवर शोध घेण्यासाठी गेले असता त्यांना तिघे जण गच्चीवर अढळले. यापैकी एक पुरुष आणि महिला नग्न अवस्थेत होते. गच्चीवर काही दारुच्या बाटल्या, कंडोमची रिकामी पाकिटे आणि चादर अशा वस्तुही कर्चमाऱ्यांना सापडल्या. कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. मात्र कोणाचीही तक्रार नसल्याचे सांगत पोलिसांनी वरवर चौकशी करुन या तिघांना सोडून दिले आहे.

तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र अटक केलेल्या महिलेची यासंदर्भात कोणतीच तक्रार नसल्याने सर्वांना सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोघे पुरुष हे कायम रुग्णालयाच्या आवारात दिसतात. ते खासगी वाहनचालक असून त्यांना रुग्णालयाची चांगलीच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आवारातच अशा प्रकार केल्याचे बोलले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three arrested form district hospital of beed