राज्यातील या तीन जिल्ह्याधिकाऱ्यांनी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांना विलगीकरणाची सक्ती करणारा काढला आदेश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

राज्य सरकारने २० ऑगस्ट रोजी राज्यांतर्गत एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात ई-पासविना प्रवास करण्याची मुभा आणि विलगीकरणाचे निर्बंध हटवण्यात आले होते; मात्र वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांना विलगीकरणाची सक्ती करणारा आदेश काढला आहे. एसटी महामंडळाने याला विरोध केला असून हा निर्णय म्हणजे राज्य सरकारच्या आदेशाची पायमल्ली असल्याचे म्हटले आहे.

मुंबई - राज्य सरकारने २० ऑगस्ट रोजी राज्यांतर्गत एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात ई-पासविना प्रवास करण्याची मुभा आणि विलगीकरणाचे निर्बंध हटवण्यात आले होते; मात्र वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांना विलगीकरणाची सक्ती करणारा आदेश काढला आहे. एसटी महामंडळाने याला विरोध केला असून हा निर्णय म्हणजे राज्य सरकारच्या आदेशाची पायमल्ली असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बस चालक आणि वाहकांनी प्रवासी बसमध्ये चढताना आणि उतरताना त्यांना विलगीकरणाची सूचना करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रवासीही या निर्णयाबाबत संभ्रमात आहेत.

मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

राज्य शासनाच्या निर्देशांनुसार प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यासंदर्भात कुठलेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेले विलगीकरण सक्तीचे आदेश राज्य शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणारे आहे.
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three district collectors state issued an order forcing segregation of ST employees and passengers