उल्हासनगरमध्ये इमारत कोसळून तीघांचा मृत्यू, अनेकजन अडकल्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thane

उल्हासनगरमध्ये इमारत कोसळून तीघांचा मृत्यू, अनेकजन अडकल्याची भीती

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे गुरुवारी पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या तहसीलदार कोमल ठाकूर यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

उल्हासनगर कॅम्प 5 येथे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला आहे. सांगितल जात आहे की, ही इमारत बेकायदेशील रित्या बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये 30 फ्लॅट होते. तर या इमारतीमध्ये अजूनही पाच कुठूंब राहत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस, महसूल आणि महापालिका अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. या घटनेत एकूण तीन लोकांचा मुत्यृ झाला आहे, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

Web Title: Three Killed In Building Collapse In Ulhasnagar Fear Of Others Trapped

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ThanepoliceaccidentMumbai