विरोधीपक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या 'या' तीन नेत्यांची नावे चर्चेत

टीम ई-सकाळ
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

महायुतीनंतर सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे विरोधीपक्षात काँग्रेस नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे आता विरोधीपक्ष नेतेच पदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे असणार आहे.

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालांनंतर आता राज्यात सरकार स्थापनेची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजप-शिवसेनेनंतर सर्वांत मोठा पक्ष म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसने जागा पटकावल्या आहेत. भाजप-शिवसेना सत्तेत आल्यानंतर विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून विरोधीपक्षनेतेपदासाठी कोणाचे नाव पुढे येणार याची उत्सुकता लागली आहे.

मी शांत आहे आणि मुक्त झाली आहे : पंकजा मुंडे
शिवसेना आमदार म्हणतात, आदित्यसाहेब तुम्हीच व्हा मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या झंजावाती प्रचारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात 56 जागांपर्यंत मजल मारता आली. त्यात रोहित पवार, धनंजय मुंडे यांच्यासारखे नेते पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. या महायुतीनंतर सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे विरोधीपक्षात काँग्रेस नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे आता विरोधीपक्ष नेतेच पदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे असणार आहे. शरद पवार आता ही जबाबदारी कोणावर सोपवणार याची उत्सुकता लागली आहे.

Image result for jayant patil esakal"

जयंत पाटील
जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यांना सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. तसेच त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळणार का?, अशी चर्चा आहे.

Image result for ajit pawar esakal"
अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या अजित पवार यांनाही सभागृहातील कामकाजाचा चांगला अनुभव आहे. मागील सभागृहात त्यांनी भाजप-शिवसेनेला धारेवर धरले होते. सभागृहात राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांनीच केले. विरोधीपक्ष नेतेपदावर राधाकृष्ण विखे-पाटील असतानाही सभागृहात अजित पवार यांनी आपली छाप पाडली होती. त्यामुळे त्यांचे नावही आघाडीवर असणार आहे.

Image result for dhananjay munde esakal"

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांचे नवाही विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी चर्चेत आले आहे. विधानपरिषदेत मुंडे यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून, उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच ते तरुण आणि आक्रमक नेते आहेत. शरद पवार यांनी या निवडणुकीत तरुणांना संधी देणार तसेच भविष्यात तरुणांची मोट बांधणार, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे अजित पवार, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय मुंडे यांना विरोधीपक्ष नेते केले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three leaders from npc in race of opposition leader maharashtra vidhan sabha