राष्ट्रवादीत राजकीय भूकंप; तीन आमदारांचे राजीनामे

three NCP MLAs resigns and they will join BJP in Maharashtra
three NCP MLAs resigns and they will join BJP in Maharashtra

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला असून, आज (मंगळवार) तीन आमदारांनी राजीनामे दिले. हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  

राष्ट्रवादी काँग्रेसला दररोज नवे धक्‍के बसत असून, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतरही ज्येष्ठ नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिग्गज नेते संदीप नाईक, सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. आज किंवा उद्या हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'राष्ट्रवादी'ची स्थिती आभाळच फाटलंय तर ठिगळं कुठं लावणार, अशी झाली आहे. 

शिवेंद्रसिंहराजे भोसले, वैभव पिचड व संदीप नाईक आणि 'राष्ट्रवादी'च्या माजी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही राजीनामा दिला असून, तेही भाजपवासी होणार आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांनी नुकतेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार संपर्कात असल्याचे म्हटले होते. 

नवी मुंबईमधील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी संपवली, असा देखील आरोप आव्हाड यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com