Sushma Andhare : "...तेव्हाच आम्ही म्हणू राज ठाकरे सत्त्याचा वाली आहे" ; सुषमा अंधारे कडाडल्या

Sushma Andhare
Sushma Andhare

जळगाव : शिवसेनेला आव्हान देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभा घेतली. छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथील सभांनंतर आता पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेतून मनसे अध्यक्ष सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना खोचक सवाल केले.

सुषमा अंधारे म्हणाले, कोरोनाचा काळ सुरू असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या ऐवजी पीएम केअर फंडात पैसे भरा, असे देवेंद्र फडणवीस म्हणत होते. तेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना राजकारण करु नका, असे का सांगितले नाही.

जेव्हा भाजप सुपारीबाज लोकांना पुढे करुन मंदीरं खुले करण्यासाठी आंदोलन करत होती. ज्यावेळी सगळी प्रार्थनास्थळ बंद होती. पण फक्त वारीच बंद आहे, असं चित्र दाखवून राज्यात अस्थिरता निर्माण करणाऱ्या भाजप नेत्यांना राजकारण करु नका, असे राज ठाकरे का म्हणाले नाहीत.

Sushma Andhare
Shivsena : "खासदारकीसाठी संजय राऊत स्वतः एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते" - संजय शिरसाट

सुषमा अंधारे म्हणाल्या, जेव्हा उत्तर प्रदेशात रस्त्यावर कोरोना ग्रस्तांनी प्रेत रस्त्यांवर जाळल्या जात होती. तेव्हा हलगर्जीपणा नव्हता का? उद्धव ठाकरे यांचे कौतुक आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले. त्यांना राबवलेला धारावी पॅर्टन देखील यशस्वी झाला. नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले.

मात्र गंगा नदीवर ज्यांच्यामुळे कोरोनाग्रस्तांची प्रेत तरंगली, त्या योगी आदित्यनाथ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्याची आपण हिंमत करणार आहात की नाही?, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना विचारला. तेव्हाच आम्ही म्हणू की खरच राज ठाकरे सत्त्याचा वाली आहे, असेही त्या म्हणाल्या.

Sushma Andhare
Sharad Pawar : कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर...; शरद पवारांनी दिला थेट इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com