वायुगळतीने तारापुरात तिघा कामगारांचा मृत्यू 

वायुगळतीने तारापुरात तिघा कामगारांचा मृत्यू 

बोईसर - तारापूर औद्योगिक वसाहतीतील एस्क्वॉयर केमिकल या कारखान्यात वायुगळतीमुळे व्यवस्थापकासह दोन कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. 12) दुपारी 3.45 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. रुग्णालयात या कामगारांची तपासणी करणाऱ्या डॉक्‍टरलाही भोवळ आल्याचे समजते. यासंदर्भात अधिक तपशील रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाला नाही. 

कंपनी व्यवस्थापक प्रभाकर खडसे (वय 59), ऑपरेटर दत्तात्रेय घुले (वय 25) आणि रघुनाथ गोरई (वय 50) अशी मृतांची नावे आहेत. एक्‍स्कॉयर केमिकल या कंपनीत हेअर डायचे उत्पादन घेतले जाते. रसायनाचे (नाव उपलब्ध नाही) मिश्रण करताना टाकीला गळती लागल्याने काही प्रमाणात घातक रसायन बाहेर पडले. त्या वेळी एका कामगाराने त्यावर पाणी टाकले. त्यामुळे रासायनिक प्रक्रियेद्वारे बाहेर पडलेल्या वायूमुळे खडसे, घुले आणि गोरई यांना त्रास झाला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बोईसर येथील तुंगा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची तपासणी करताना एका डॉक्‍टरलाही वायूची लागण झाल्याने भोवळ आली. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. यासंदर्भात अधिक माहितीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. 

एस्क्वॉयर केमिकल कंपनीत गळती झालेल्या वायूचा दुर्गंध इतका उग्र होता की तारापूर औद्योगिक वसाहतीच्या दोन ते तीन किलोमीटर परिसरात दुर्गंधी पसरली होती. दुर्घटनेनंतर या कंपनीच्या परिसरातील इतर पाच-सहा कंपन्यांनाही पोलिसांनी कामकाज बंद करण्याची सूचना केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com