'ठग्ज...'चा पहिल्याच दिवशी 50 कोटींचा गल्ला

Thugs-of-Hindostan
Thugs-of-Hindostan

मुंबई - अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांची प्रथमच जुळून आलेली जोडी, भव्यदिव्य सेट्‌स, लखलखती लोकेशन्स अन्‌ भरपूर ऍक्‍शनमुळे सजलेल्या "ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ची प्रदर्शनापूर्वीच चर्चा रंगली होती.

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असल्या, तरी बॉक्‍स ऑफिसवर "ठग्ज...'ने चांगलीच कमाई केली आहे.

पहिल्याच दिवशी 50 कोटींचा गल्ला जमवला. आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी एवढी कमाई केलेली नाही, असा अंदाज एका संकेतस्थळाने वर्तवला आहे. दिवाळीत जोडून आलेल्या सुट्यांमुळे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत आहेत. याआधी दिवाळीत प्रदर्शित झालेल्या "प्रेम रतन धन पायो' चित्रपटाने 39 कोटींहून अधिक कमाई केली होती; पण आता "ठग्ज...'ने त्याहीपेक्षा जास्त कमाई करत नवा विक्रम केला आहे. "ठग्ज ऑफ हिंदोस्तान...'बरोबर हिंदीत आणखी कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण देशभरातून त्याचे आगाऊ आरक्षण करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com