स्वातंत्र्यदिनी तंबाखूप्रिय सरपंचांचे भाषण; सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

पुणे : स्वातंत्र्य दिनादिवशी अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या लोकांची भाषणे आपल्याला ऐकायला मिळत असतात. प्रसिद्ध व्यक्तींच्या भाषणांच्या चर्चाही रंगलेल्या पाहायला मिळत असतात. पण सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु आहे ती अशाच एका आगळ्या वेगळ्या भाषणाची.

एक तंबाखू प्रिय सरपंच गावातील स्वातंत्र्य दिनाचे भाषण कशाप्रकारे देतो याचा किस्सा सांगणारा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारताच्या स्वातंत्र्याची कथा सांगतानाच हातवारे करताना तंबाखू मळण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली असल्याने नेटकऱ्यांना हा व्हिडिओ भलताच पसंत पडला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सरपंचाला तंबाखू खाल्ल्याशिवाय भाषण करता येत नाही अशी पंचाईत असते. अशावेळी हा सरंपच पाठ केलेलं भाषण कशापद्धतीने देतो याची नक्कल कृतीसहीत करुन दाखवली आहे. भारत देशामध्ये ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून दाखल झाले असे सांगताना खिशातून तंबाखूची पुडी काढून ती हातावर टाकताना ‘ब्रिटिश व्यापारी म्हणून भारतात टीपी टीपी टीपी टीपी करत दाखल झाले,’ हे कृतीतून दाखवल्याचा किस्सा भन्नाट आहे. एकूण हा व्हिडिओ बघितल्यावर आपण हसल्याशिवाय राहत नाही हेच खरे !

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tobacco Lover Sarpachas Independence Day Funny Speech Goes Viral