Bacchu Kadu: आज बच्चू कडूंच्या भूमिकेकडं सर्वांच लक्ष, मेळाव्याच्या ठिकाणी झळकले 'मै झुकेगा नही' चे पोस्टर

बच्चू कडू नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष
Bacchu Kadu
Bacchu KaduEsakal

अमरावतीत आज आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादासंदर्भात बच्चू कडू आज त्यांची भुमिका मांडणार आहेत. कडू नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अमरावतीत ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी 'मै झुकेगा नही' अशा स्वरूपाचे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला वाद चांगलाच रंगला होता. त्यानंतर या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि या वादावर पडदा पडला. शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच बच्चू कडू यांनी त्यांच्याबाबत वापरलेले शब्द मागे घ्यावेत असंही रवी राणा यांनी म्हटलं. त्यामुळं आज या संदर्भातही बच्चू कडू नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Bacchu Kadu
Bhaskar Jadhav: फडणवीस चलाख असल्याचं सांगत भास्कर जाधवांच्या राणा-कडू यांना शुभेच्छा

आमदार रवी राणा यांनी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. रवी राणांना या आरोपाबाबत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. याबाबत रवी राणांना एक नोव्हेंबरचा अल्टीमेटम दिला होता. तो अल्टीमेटम आज संपत आहे. अद्याप रवी राणांनी याबाबत कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत. त्यानंतर आज बच्चू कडू आपली भूमिका मांडणार आहेत. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर केले नाहीत तर आपण कोर्टात धाव घेऊन मानहाणीचा दावा दाखल करणार असल्याचंही आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं होतं.

Bacchu Kadu
राणा नमले, कडू आक्रमक : शिंदे-फडणवीसांची मध्यस्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com