बारावीचा आज निकाल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

बारावीचा निकाल येथे पाहा 
- www.mahresult.nic.in 
- www.hscresult.mkcl.org 
- www.maharashraeducation.com 

पुणे - फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. 30) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षी 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. राज्यातील दोन हजार 822 केंद्रांवर ही परीक्षा झाली. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान ही परीक्षा झाली. राज्यातील सुमारे नऊ हजार 486 कनिष्ठ महाविद्यालयांतून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात आठ लाख 34 हजार 234 विद्यार्थी, तर सहा लाख 50 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश होता. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेले गुण दिसणार आहेत आणि त्याची प्रतही घेता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. 

विद्यार्थ्यांसाठी सूचना 
- निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. - गुणपडताळणीसाठी 31 मे ते 9 जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी 31 मे ते 11 जूनपर्यंत अर्ज करता येईल. 
- उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करावा 
- विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसाधर योजनेंतर्गत परीक्षेस पुन:श्‍च प्रविष्ट होण्यासाठी जुलै-ऑगस्ट 2018 आणि फेब्रुवारी-मार्च 2019 या दोनच संधी राहतील. 
- बारावीची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये देता येईल. 

Web Title: Today HSC Result