अभिमानास्पद! मॉरेशियसमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण; फडणवीस राहणार उपस्थित

statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Mauritius
statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Mauritius

मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आज मॉरेशियसमध्ये अनावरण होणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस मॉरेशियसला रवाना झाले आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर करून माहिती दिली.

आपल्या पोस्टमध्ये फडणवीस म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज मॉरिशस येथे होणार. समुद्रापार घुमणार शिवगर्जना! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मॉरिशसमध्ये उभारला जातोय. त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभते आहे. यापेक्षा आनंद तो कोणता, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

फडणवीस यांनी काही तासांपूर्वीच मॉरेशियसकडे प्रस्थान केलं आहे. याबाबतचे फोटेही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज सायंकाळी साडेसात वाजता पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com