कोल्हापूर, रत्नागिरीत आज "तनिष्कां'साठी मतदान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाची निवडणूक बुधवारी (ता. 16) कोल्हापूरसह रत्नागिरी जिल्ह्यांत होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 38 मतदारसंघांत तर रत्नागिरीतील पाच मतदारसंघांत एकूण 79 उमेदवार आहेत. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत प्रत्यक्ष बुथवर किंवा उमेदवारांना मोबाईल मतदान क्रमांकावर मिस्डकॉलद्वारे आपले मत नोंदवता येणार आहे. दरम्यान, दुपारी तीनपर्यंत त्या त्या मतदान केंद्रावर निकाल जाहीर केला जाणार आहे. 

तनिष्का निवडणुकीसाठी गेला महिनाभर उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली असून, सोशल मीडियाचा खुबीने वापर केला आहे. व्हॉटस्‌ऍप, फेसबुकद्वारे आपली भूमिका, मतदान मोबाईल क्रमांक पोचवला जात आहे. मतदार केंद्रातील बुथ निश्‍चित झाले असून तेथे तयारी पूर्ण झाली आहे. महिलांनी मतदान केंद्रावर जायचे, तेथे मतपत्रिका घ्यायची, उमेदवारांपैकी एका उमेदवाराच्या नावासमोर "1' अंक लिहायचा आहे. ती पत्रिका मतपेटीत टाकायची आहे.

याशिवाय, मतदारांना आपल्या मोबाईलवरून मिस्डकॉल देऊन मत नोंदवता येऊ शकेल. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला टोल फ्री क्रमांक दिला आहे. 

प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, कागल, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यांत उमेदवारांनी प्रचारावर भर दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरीसह लांजा, खेड, गुहागर, चिपळूण येथेही दिवसभर प्रचारावर उमेदवारांनी भर दिला.

Web Title: today kolhapur ratnagiri tanishka election