राज्यात आज "सीईटी' परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नाशिक - इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी.एस्सी (कृषी) आदी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुरुवारी (ता.10) एमएचटी-सीईटी परीक्षा होत आहे. राज्यभरातून चार लाख 35 हजार 606 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेला सकाळी सव्वा नऊपासून सुरवात होणार आहे. प्रत्येकी दीड तास कालावधीचे तीन पेपर असून, परीक्षा सायंकाळी साडेचारला संपेल. 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी परीक्षेचे संयोजन केले जात आहे. यापूर्वी फक्त अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात होती. यात या वर्षी प्रथमच बी.एस्सी. (कृषी) या अभ्यासक्रमाचाही समावेश केला आहे. 

Web Title: Today in the state CET examination