पेठला आजपासून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

इस्लामपूर - व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्था संचालित नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ (ता. वाळवा) येथे उद्या (ता. ५) ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होत आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतून ४५० विज्ञान प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य महेश जोशी व विभागीय  विद्या प्रतिष्ठान नागपूरचे प्रा. प्रफुल्ल कचवे यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

इस्लामपूर - व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्था संचालित नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ (ता. वाळवा) येथे उद्या (ता. ५) ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होत आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतून ४५० विज्ञान प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य महेश जोशी व विभागीय  विद्या प्रतिष्ठान नागपूरचे प्रा. प्रफुल्ल कचवे यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

ते म्हणाले, ‘‘५ ते ८ एप्रिल असे चार दिवस हे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार  आहे. ५ एप्रिलला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. अध्यक्षस्थानी वनश्री नानासाहेब महाडिक असून कार्यक्रमास जि.प.चे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कोल्हापूर जि.प.च्या अध्यक्षा शौमिका अमल महाडिक, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, राज्याचे शिक्षण संचालक नामदेवराव जरग, गोविंदराव नांदेडे, व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक, संचालक सम्राट महाडिक यांची उपस्थिती आहे. त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता विज्ञान दिंडी निघेल. साडे १२ वाजता मूल्यमापन प्रक्रिया, संध्याकाळी साडे सातला विज्ञान आणि संस्कार या विषयावर प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान होईल. गुरुवारी (ता. ६) सकाळी १० ते साडे पाच मूल्यमापन प्रक्रिया, सायंकाळी सहा ते नऊ सांस्कृतिक कार्यक्रम, शुक्रवारी (ता. ७) सकाळी १० वाजता मूल्यमापन प्रक्रिया, सायंकाळी साडे पाच वाजता एक दिवशीय विज्ञान मेळावा, अन्न सुरक्षा या विषयी डॉ. राम कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होईल. सायंकाळी सात वाजता ग्रामीण कथाकथनकार अप्पासाहेब खोत यांचे कथाकथन होईल. साडे आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवारी (ता. ८) दुपारी बारा वाजता राहुल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली व कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण संचालक नामदेवराव जरग, गोविंद रानडे, सम्राट महाडिक उपस्थित राहतील. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे यांचे मार्गदर्शन होईल. माधुरी सावरकर, मारुती गोंधळी, महेश जोशी, डॉ. प्रकाश जाधव, उषादेवी वाघमोडे, महेश चोथे संयोजन करीत आहेत. 

सांगली जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलल्या 
२५ वर्षांतून पहिल्यांदा राज्यस्तरीय प्रदर्शनाचा मान सांगली जिल्ह्याला मिळत आहे. यात राज्याच्या सर्व जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेले विज्ञान प्रकल्प मांडले जाणार आहेत. यातूनच एखादा बालवैज्ञानिक निर्माण होऊ शकतो, असा शासनाचा मानस आहे. हे प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांना पाहावयास मिळावे यासाठी ५ ते ८ एप्रिल दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सांगली जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

Web Title: Today the state science fair