आज कर्नाटक जिंकले उद्या देशही जिंकेल - विखे पाटील

radhakrushn vikhe patil
radhakrushn vikhe patil

मुंबई : "लोकशाही धाब्यावर बसवून बळकावलेले कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाला अखेर सोडावे लागले असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी केलेल्या खटाटोपातून भाजपचा लोकशाहीविरोधी चेहरा समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन देशभरातील राजकीय चित्र पटलणार आहे. आज कर्नाटक जिंकेल उद्या देशही जिंकेल." असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.  
कर्नाटकातील राजकिय परिस्थितीवर बोलताना विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११६ आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केली. परंतु, राज्यपालांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय न घेता कागदावरसुद्धा बहुमत नसलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेची संधी दिली. भाजपने केवळ १०४ आमदारांची यादी दिली होती. राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयामुळे घोडेबाजाराला चालना मिळून लोकशाहीचे धिंडवडे निघणार होते. परंतु, सरतेशेवटी भाजप यात यशस्वी होऊ शकली नाही आणि येडीयुरप्पांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर आता तेथील राज्यपालांना एक क्षणभरही पदावर राहण्याचा अधिकार नाही.
लोकशाही अन् नितिमत्तेच्या गप्पा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा मुखवटा गळून पडला असून, संपूर्ण देशाला त्यांची खरी ओळख झाली आहे. मागील दोन-तीन दिवसांत काँग्रेस आमदारांना लालूच देण्यासंदर्भात समोर आलेले फोन रेकॉर्डिंग्स, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आमदारांवर दबाव आणण्याचे झालेले प्रयत्न पाहता या संपूर्ण घटनाक्रमाचे पडसाद पुढील काळात भारताच्या कानाकोपऱ्यात उमटताना दिसत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com