Railway
Railwayesakal

मध्य रेल्वेवरील स्थानकांवर मोफत वाय-फाय

प्रवाशांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेवरील ३७९ स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली.
Summary

प्रवाशांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेवरील ३७९ स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली.

पुणे - डिजिटल इंडियाचे (Digital India) स्वप्न साकार करण्याकडे रेल्वेने (Railway) पाऊल उचले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रवाशांना इंटरनेट सुविधा (Internet Facility) उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेवरील ३७९ स्थानकांवर मोफत वाय-फाय (free Wi-Fi) सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली.

या आधुनिकीकरणाच्या युगात प्रत्येकजण स्मार्टफोन वापरत आहे. ही एक ‘डिजिटल इंडिया’ क्रांतीच आहे. त्यामुळे २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात स्थानकांवर मोफत वाय-फाय इंटरनेट सुविधा देण्याचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. त्यानुसार देशातील दुर्गम खेड्यांतील रेल्वे स्थानकापर्यंत मोफत वाय-फाय सेवा दिली जात आहे. मध्य रेल्वेच्या चार हजार १५२ किलोमीटर मार्गावरील ३७९ स्थानके हायस्पीड वाय-फाय इंटरनेटसाठी ऑप्टिकल फायबर केबलने जोडली आहेत. स्थानकातील वापरकर्त्या प्रवाशाला हाय डेफिनिशन (एचडी) व्हिडिओ स्ट्रीमिंग, चित्रपट, गाणी, गेम डाऊनलोड करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यालयाचे काम ऑनलाइन करण्यासाठी या सुविधेचा वापर करता येणार आहे, असे रेल्वेने सांगितले.

 Railway
पोलिस भरती प्रकरण : परीक्षार्थींना उत्तर सांगणाऱ्या पोलिस अंमलदारास अटक

...असे जोडू शकता वायफाय

रेलवायर वाय-फाय सुविधा वापरण्यास सुलभ आहे. कनेक्शन जोडण्यासाठी वाय-फाय पर्याय स्कॅन करणे आणि रेलवायर निवडणे आवश्यक आहे. एकदा ब्राउझर वापरकर्त्याला रेलवायर पोर्टलवर घेऊन गेला की, तो एक मोबाईल नंबर विचारेल ज्यावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठविला जाईल. एकदा कनेक्ट झाल्यानंतर वाय-फाय कनेक्शन ३० मिनिटे चालेल, यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या माहितीसह अपडेट राहण्यास मदत होणार आहे.

विभागानुसार वाय-फाय असलेली स्थानके

विभाग स्थानके

मुंबई ८८

भुसावळ ८३

नागपूर ७४

पुणे ५६

सोलापूर ७८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com