राज्यातील 1 कोटी 66 लाख ग्राहकांकडे स्मार्ट वीजमीटर बसणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electric meter
राज्यातील 1 कोटी 66 लाख ग्राहकांकडे स्मार्ट वीजमीटर बसणार

राज्यातील 1 कोटी 66 लाख ग्राहकांकडे स्मार्ट वीजमीटर बसणार

मुंबई - राज्यातील वीज वितरण यंत्रणा अत्याधुनिक करण्यासाठी ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार राज्यातील एक कोटी ६६ लाख ग्राहकांकडे स्मार्ट वीजमीटर बसवण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यामुळे ग्राहकांना अचूक वीज बिल मिळणार असून महावितरणची वितरण हानी कमी होऊन महसुलात वाढ होण्याचा अंदाज आहे.

राज्यातील वीज वितरण यंत्रणा सुधारण्यासाठी वितरण क्षेत्र योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी ग्राहकांसोबतच वितरण रोहित्रे आणि वीज वाहिन्यांचे स्मार्ट मिटरिंग करण्यासाठी ११ हजार १०५ कोटींची अंदाजित तरतूद करण्यात येणार आहे. यात सर्व वर्गवारीतील एकूण एक कोटी ६६ लाख ग्राहकांना तसेच चार लाख सात हजार वितरण रोहित्र तर २७ हजार ८२६ वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसवण्याचे या योजनेत प्रस्तावित करण्यात आले आहे.

मीटर नसलेल्या वाहिन्यांचे मीटरिंग आणि विद्यमान मीटर ऑनलार्इन करणे आदी कामांसाठी ११ हजार १०५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यिक व तांत्रिक हानी असलेल्या अमृत शहरांच्या विभागातील ३७ लाख ९५ हजार ४६६ ग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर बसवण्यात येतील. वाणिज्यिक व तांत्रिक हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहराच्या विभागाच्या व्यतिरिक्त इतर शहरी विभागातील दोन लाख ६० हजार ४१७ ग्राहक; तर ग्रामीण भागातील २६ लाख ६७ हजार ७०३ स्मार्ट मीटर बसवण्यात येतील.

सर्व व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय व उच्च दाब वीज वापर असलेले २६ लाख ९५ हजार ७१६ ग्राहकांकडेदेखील हे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. तसेच या विभागांमधील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगरशेतीसाठीची दोन लाख ३० हजार ८२० वितरण रोहित्रे आणि २७ हजार ८२६ वितरण वीज वाहिन्यांवर स्मार्ट मीटर बसवण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावयाची आहेत. याशिवाय मार्च २०२५ पर्यंत वाणिज्यिक व तांत्रिक हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहरातील ५५ लाख ३८ हजार ५८५ वीजग्राहकांकडेही हे स्मार्ट मीटर बसवले जातील.

वाणिज्यिक व तांत्रिक हानी २५ टक्क्यांपर्यंत असलेल्या अमृत शहराच्या विभागाव्यतिरिक्त ग्रामीण विभागातील १६ लाख ६० हजार ९४६ ग्राहकांना स्मार्ट मीटर आणि या विभागातील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची एक लाख ७६ हजार ६८७ वितरण रोहित्रांचे स्मार्ट मिटरिंग करण्यात येणार आहे. अशा एकूण एत कोटी ६६ लाख ग्राहकांना; तर चार लाख सात हजार वितरण रोहित्रांना आणि २७ हजार ८२६ वीजवाहिन्यांना स्मार्ट मीटर बसवणे प्रस्तावित असल्याचेदेखील विजय सिंघल यांनी सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07996 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..