Todays Rain Updates : राज्यात आज कसा असेल पाऊस? मुंबईत रेड अलर्ट! पुण्यात नेमकी काय स्थिती?

Pune Rain updates: शुक्रवारी घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ तर पुणे शहरासह पूर्वेकडील भागात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. हवेतील आद्रता आणि पावसामुळे दृष्यमानता घटण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Updatesakal
Updated on

Mumbai Rain Updates : मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. बुधवारी दिवसभर, रात्रभर आणि पुन्हा गुरुवारी दिवसभर पाऊस असल्याने राज्यातल्या अनेक नद्या दुथडी भरुन वाहात आहेत. मुंबई-पुण्यामध्ये तर जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मागच्या ४८ तासांमध्ये पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत काय स्थिती?

मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. शहरासह उपनगरातल्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मुंबईमध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाने विश्रांती दिलेली आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला.

पुण्यात शुक्रवारी कसा असेल पाऊस?

बुधवारी (ता.२४) रात्री झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पुर आला असून बहुतेक धरणं पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठ व सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. जिल्ह्याचा घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शुक्रवारी (ता.२६) देखील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ तर पुणे शहरासह पूर्वेकडील भागात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. हवेतील आद्रता आणि पावसामुळे दृष्यमानता घटण्याची शक्यता आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती

खडकवासला – ९८.४१ टक्के

टेमघर – ६७.०८ टक्के

वरसगाव – ६९.४८ टक्के

पानशेत – ८१.६२ टक्के

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती

अप्पर वैतरणा – ३४.४३ %

मोडक सागर – ९८.४६ %

तानसा – ९९ %

मध्य वैतरणा – ६३.०३ %

भातसा – ६४.०७ %

विहार – ९९ %

तुळशी – ९९ %

Maharashtra Rain Update
Video | खापरखेडा फाटकावर धक्कादायक घटना: स्कूलबस रेल्वे रुळावर अडकली.. अन् समोरून भरधाव रेल्वे आली

शुक्रवारी सकाळी ७ वाजता कोयना धरणाच्या सांडव्यावरून ३०,००० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ३२,१०० क्युसेक आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com