पाण्याअभावी ग्रामीण भागात शौचालयांचे तीन तेरा 

toilets in the rural areas in bad condition due to lack of water
toilets in the rural areas in bad condition due to lack of water

झोडगे (जि. नाशिक) : केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला आहे. मात्र, या शौचालयांचा वापर न करता लाभार्थी ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असल्याने या स्वच्छता अभियानाचा गावोगावी फज्जा उडाला आहे. प्रत्येक गावात प्रशासनाकडून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्ती तर ग्रामपंचायतीकडून झाली. मात्र, गावोगावी संबंधित ग्रामस्थांमध्ये जनजागृती न झाल्याने परिणाम दिसून येत नाही. काही ठिकाणी पाण्याअभावी नागरिक बाहेर जात असल्याचे बोलले जाते. 

तालुक्‍यात गावामधील बहुतांश नागरिक हे घरामध्ये शौचालय असूनही त्याचा वापर करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे तयार झालेली शौचालये केवळ शोभेची वस्तू बनली आहेत. तसेच काही शाळा, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीच्या शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे. तर, काही ग्रामपंचायतींना अजून शौचालये उपलब्ध नाहीत. अनेक गावांत रस्त्यालगत व पांदीच्या ठिकाणी ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहेत. यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com