कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली पर्यटन निवासस्थाने आता होणार पुन्हा खुली

अनिल सावळे
शुक्रवार, 10 जुलै 2020

लॉकडाउन घोषित केल्यानंतर पर्यटन महामंडळाची पर्यटक निवासस्थाने बंद होती. मात्र, राज्य सरकारच्या ''मिशन बिगीन अगेन''नुसार पुन्हा हॉटेल्स आणि लॉज सुरु होत आहेत. तसेच, काही अटी-शर्तींवर रिसॉर्ट्सही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची राज्यातील माळशेज, माथेरान, महाबळेश्वर, तारकर्ली,  गणपतीपुळेसह इतर रिसॉर्ट्स सुरू होत आहेत. स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली पर्यटन निवासस्थाने आता पुन्हा खुली होत आहेत. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन घोषित केल्यानंतर पर्यटन महामंडळाची पर्यटक निवासस्थाने बंद होती. मात्र, राज्य सरकारच्या ''मिशन बिगीन अगेन''नुसार पुन्हा हॉटेल्स आणि लॉज सुरु होत आहेत. तसेच, काही अटी-शर्तींवर रिसॉर्ट्सही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची राज्यातील माळशेज, माथेरान, महाबळेश्वर, तारकर्ली,  गणपतीपुळेसह इतर रिसॉर्ट्स सुरू होत आहेत. स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून पर्यटन निवासस्थानांची दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व रिसॉर्ट्स सुरू करण्यात येत आहेत, असे पर्यटन महामंडळाकडून सांगण्यात आले.

Image may contain: text that says "कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याबाबत आवश्यक खबरदारी घेण्याबाबत प्रशिक्षण दिले आहे. थर्मल गन, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. "वेलनेस मेडिकल टुरिझम" पर्यटकांसाठी रिसाॉर्टवर "वेलनेस मेडिकल टुरिझम हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांनाखास पर्यटकांना मागणीनुसार ऑरगॅनिक फूड, तज्ज्ञांकडून पंचकर्म, आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही पर्यटक निवासस्थाने होणार सुरु पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत माळशेज, माथेरान, महाबळेश्वर, पानशेत, कार्ला लोणावळा आणि कोयनानगर येथील पर्यटक निवासस्थाने सुरू आहेत."

स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पर्यटक निवासस्थाने सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्याबाबत प्राधान्य देण्यात येत आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर पर्यटक निवासासाठी बुकिंग सुरू करण्यात येत आहे.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist residences closed due to corona outbreak will now be reopened