आनेवाडी टोल नाक्‍यावर त्रासदायक कोंडी 

आनेवाडी टोल नाक्‍यावर त्रासदायक कोंडी 

सायगाव - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पुणे- बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्‍यापासून सातारा आणि पुणे या दोन्ही बाजूकडे दुपारी तीनपासून सायंकाळपर्यंत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक आणि रुग्णांना विकतचा मनस्ताप भोगावा लागला. 

जिल्ह्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने वादग्रस्त ठरणाऱ्या टोल नाका व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार आज अक्षरश: चव्हाट्यावर आला. दुसरा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या आणि लग्न समारंभाची मोठी तिथी यामुळे आज आनेवाडी टोल नाक्‍यावर दुपारी तीन वाजल्यापासून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगा आनेवाडीपासून गौरीशंकर कॉलेजपर्यंत लागल्या होत्या. या रांगा सेवा रस्त्यावरही होत्या. त्यामुळे महामार्गावर आज वाहतुकीचा बोजवारा उडाला. अनेक वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले. 

या सर्व प्रकारात टोल नाका कर्मचारी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धाब्यावर बसवत कितीही उशीर झाला तरी वाहने टोल घेतल्याशिवाय न सोडता वसुलीचे काम करताना दिसत होते; पण वाहनांच्या रांगांचे त्यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचेही स्पष्ट दिसून आले. वाहतूक सुरळीत करण्याचे कोणतेही नियोजन टोल नाका परिसरात नव्हते. त्यामुळे वाहनचालक आणि दुचाकी चालकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 

या सर्व प्रकारात स्थानिक फिरत्या विक्रेत्यांची मोठी चंगळ झाली. शेतातील भाजी, पाण्याच्या बाटल्यांची चांगली विक्री झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com