पोलिसांच्या गुन्हे शाखेत खांदेपालट
मुंबई - लाच घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष 10 चे पोलिस निरीक्षक आनंद भोईर यांना अटक झाल्यानंतर खांदेपालट करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणे देऊन चार महत्त्वपूर्ण कक्षांमध्ये नव्या प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचार सहन केला जाणार नसल्याचा संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बदल्यांमार्फत कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई पोलिसांसाठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस कारवाईचा ठरला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंद भोईर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 22 लाखांची लाच घेताना अटक केली. दारूबंदीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी विक्रेत्याकडे 25 लाखांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या अटकेनंतर गुन्हे शाखेत फेरबदल करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत कक्ष 10 चे पोलिस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांची प्रतिबंधक शाखेत रवानगी करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष 7 चे प्रभारी अनिल माने यांना कक्ष 10 चे नवे प्रभारी बनवण्यात आले आहे. याशिवाय रिक्त असलेल्या कक्ष 8 चे प्रभारी अधिकारी म्हणून अरुण पोखरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कक्ष 7 च्या प्रमुखपदी सचिन तावरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.