फडणवीस सरकार आणखी मेहेरबान; मिळणार हवी तिथे बदली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मुंबई : इच्छितस्थळी बदली व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळात सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या इच्छेनुसार बदली करून घेता येणार आहे. या बदलीसंदर्भातील आदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.

मागील 15 वर्षांपासून एसटी वाहक-चालकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, त्यांच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आलेला नाही. मात्र, आता राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी सेवेत असणारे वाहक-चालकांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

दरम्यान, या निर्णयामुळे बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील 3307 कर्मचाऱ्यांसाठी ही नववर्षाची भेट असणार आहे.

कोकणात अनेक अर्ज

चालक-वाहकांचे बहुतांश अर्ज हे कोकण विभागातून आलेले आहेत. कोकण विभागात सेवेत आल्यानंतर आठवड्याभरातच कर्मचाऱ्यांनी बदलीचे अर्ज दिल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Transfer Policy Changed in State Transport in Maharashtra